“राजेंद्र पारधी” हा माझ्या जेएनव्हीच्या काळातील वर्गमित्र. साधेपणा आणि शांततेचं प्रतीक असलेला हा मुलगा! त्याच्याशी जोडलेल्या आठवणी नेहमी मनात एक प्रेरणादायी भावना निर्माण करतात. त्याच्या साधेपणाने आणि शांत स्वभावाने तो नेहमीच लक्षात राहतो. त्याच्या घरच्या परिस्थितीबद्दल मला फारशी माहितीनाही, आणि तो बॉईज होस्टेलमध्ये राहायचा, त्यामुळे त्याने जेएनव्हीतील जीवनाला कसे सामोरे गेले असेल, याची नेमकी कल्पना त्यालाच माहीत. पण जेव्हा कधी तो वर्गमित्र म्हणून आठवतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच प्रतिमा उभी राहते—लांबट, एकाच रंगाचा इस्त्री नसलेला शर्ट, तोही शर्ट इन केलेला नसलेला; हातात फक्त एक पुस्तक; आणि पायात साधी चप्पल घालत वावरणारा एक साधा मुलगा.
क्लासमधील अस्तित्व : राजेंद्र कधीही वर्गात फारसा उठून दिसला नाही. तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांपैकी एक होता—नवोदय मध्ये गुणवत्तेत हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत कधी असल्याच आठवत नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांत किंवा खेळांमध्ये फारसा सक्रिय नसलेला आणि जर आमच्या पाठक सरांनी एखादे गाणे तयार केले आणि त्यात त्याला स्थान दिले, तरच तो थोडासा नजरेत यायचा. बाकी वेळी तो मागच्या बाकांवर गप्प बसायचा. त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यासारख अस काहीच नव्हत त्यामुळे कधी त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिला नाही.
कॉलेजमधील विद्यार्थी सारख त्याच्या हातात नेहमी एकच पुस्तक असायची आणि वर्गात स्लीपर घासत येण्याचा आवाज आला की, क्लासमध्ये "बे पारधी आया" असा आवाज जेव्हा मुलं टाकायची, तेव्हा तो फक्त लाजरी स्माईल देतांना बघितल आहे. राजेंद्र म्हणजे कुठल्याही वादात, चिडवणीत किंवा फालतू गोष्टींमध्ये कधीच सहभागी न होणारा मुलगा. त्याकाळी जेएनव्ही मध्ये मुलामुलींचे नाव जोडण्याचा ट्रेंड सुरू होता. म्हणजे बॅचमध्ये जेवढ्या पण मुली होत्या सगळ्यांना कुणाच्या ना कुणाच्या नावाने चिडवायचे पण पारधी भाऊ कडे कुणीच त्या अँगेल ने कधी पाहिलं नाही राजेंद्र कधीच पडलाच नाही. मग क्लासचा एक सभ्य मुलगा म्हटलं तरी चालेल
दहावीपूर्वीची शांतता : सहावी ते दहावीपर्यंत अभ्यासाच्या बाबतीत फारसं कुणी गंभीर नव्हतं सगळे अभ्यासात थोडेफार कमी जास्त असायचे. राजेंद्रही त्याच वर्तुळाचा एक भाग होता. दहावीपर्यंत तो केवळ एका सामान्य विद्यार्थ्याच्या रूपात लक्षात राहिला. पण दहावीच्या बोर्ड परीक्षेनंतर मात्र त्याच्यात एक विलक्षण बदल जाणवला. मागच्या बेंचवर बसणारा राजेंद्र आता फर्स्ट बेंचवर आला.
अकरावीतील राजेंद्र : अकरावीमध्ये राजेंद्रने स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं होतं. तो कायम वर्गात पहिल्या बाकावर, खिडकीजवळ एकटाच बसलेला दिसायचा. नवोदय मध्ये आम्हाला वर्ग स्वतः झाडून स्वच्छ करण्याची ड्यूटी लागायची. आमची जेव्हा जेव्हा क्लास क्लिनिंग ची ड्युटी असायची सकाळी क्लासमध्ये त्याच्या बेंच जवळ खूप कागदांचा गोळा दिसायचा. एकदा मी सहजच एक कागदाचा गोळा उघडून बघितल तर त्यात Mathematical equtions हे.solve केलेले होते. तेव्हा मला समजलं की राजेंद्र ते खराब कागद नसून राजेंद्र चा अभ्यास आहे. ते पाहून कळायचं की तो किती मेहनत घेत होता. अकरावी आणि बारावीत सगळे जिथे मौजमजा, खेळ किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतलेले होते, तिथे राजेंद्र मात्र तीच बेंच, तीच शर्ट पॅन्ट आणि तीच चप्पल झालून फक्त आपल्या अभ्यासात मग्न असायचा. त्याचं डोकं कायम पुस्तकांत असायचं आणि प्रॉब्लेम सॉल्व होईपर्यंत तो शांत बसायचा नाही.
12 वी चे महत्वाचे वर्ष असल्यामुळे आम्ही सुद्धा अभ्यासाला लागलो. कुणाला कुणाकडे बघायला वेळ नव्हता आणि असं करता करता केव्हा सत्र संपले आणि आम्ही नवोदय मधून पासआऊट झालो झालो कळलंच नाही.
जग जिंकणारी भरारी: नवोदयमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही काही काळ संपर्कात नव्हतो. कोण कुठे शिक्षण घेत की कोण कुठे नोकरी करत आहे कुणाबद्दल काहीच माहित नव्हतं. But, thanks to Facebook. फायनली हमारे क्लास का चमकता सितारा मला FB वर भेटला राजेंद्र च्या प्रोफाईलवर नजर गेली, आणि मी अवाक् झालो! I was to see his pics in Paris. त्याच्या यशस्वी प्रवासाने मनात अभिमान दाटून आला आणि क्षणभरासाठी नवोदय चा तो राजेंद्र डोळ्यापुढे आला. साध्या गावातून आलेला राजेंद्र आज परदेशात पोहोचला हे खूप मोठ achievement होतं आणि आहेच.
नवोदयचा मोलाचा वाटा : राजेंद्रने उंच भरारी मारली पण त्याच्या पंखाणा मिळालेले बळ यात नवोदय चा मोलाचा वाटा आहे. राजेंद्रचं यश हे त्याच्या मेहनतीसोबत नवोदय विद्यालयाने त्याला दिलेल्या शिकवणीचं फलित आहे. नवोदय ने कुटुंबापासून दूर राहून, कठीण प्रसंगांना सामोरं जाताना शिकलेली शिस्त आणि आत्मविश्वासाने त्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी बळ दिलं. नवोदयमधील शिक्षणाने त्याला मोठं स्वप्न पाहायला आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला शिकवलं. नवोदयचा मोलाचा वाटा चांगल्या क्षणांना असो वा नसो वाईट क्षणांना तर नक्कीच असतो ते वाईट क्षण लढण्याला शिकवतात. मग अशांना अशा मुळे मोठे प्रॉब्लेम पण लहान वाटायला लागतात.
राजेंद्र, तुझा प्रवास खूपच अभिमानास्पद आहे. तुला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा! *"साधेपणात मोठेपण आहे," हे राजेंद्रकडून शिकण्यासारखं आहे.*
Related Posts
Lorem Porta - Aug 13, 2016
Nulla Quis - Aug 17, 2016