यथार्थवर अभिनंदनाचा वर्षाव यथार्थच्या यशाबद्दल जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले. यामध्ये – जिल्हाधिकारी आणि नवोदय विद्यालय पाचगावचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) रविंद्र सलामे,जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) रविंद्र सोनटक्के, JNV प्राचार्य उषा धारगावे, तसेच शिक्षक अजय अग्निहोत्री, राजेश येलणे, एम. सुधाकर, शिवाजी आवारी, विपुल रामटेके, निता मेश्राम, हेमंत गायकवाड, वाहिद शेख, एच.एस. सोरते, मनीषा ठाकरे, ज्योती, प्रतिभा बुंदेले, हितेश वाळके, नूतन कुमारी झा आणि इतर शिक्षक-विद्यार्थ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.
JNV भंडारा – देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रीय अभिमानाच्या मूलभूत मूल्यांना चालना देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने आयोजित वीरगाथा 4.0 उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील यथार्थ वासनिक याने विशेष कामगिरी केली आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी, गणतंत्र दिनाच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याचा दिल्लीतील कर्तव्यपथावर सन्मान करण्यात आला. यथार्थ वासनिक जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव येथे दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. आपल्या या यशाने तो अत्यंत आनंदी आणि गौरव अनुभवीत असल्याचे त्याने सांगितले. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वीरगाथा 4.0 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील १०० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये ६६ मुली आणि ३४ मुले सहभागी होती. त्यांना प्रमाणपत्र, पदक आणि ₹१०,००० रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. दिल्लीतील सन्मान समारंभात विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. प्रमुख पाहुण्यांमध्ये समाविष्ट होते – - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ,चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार, डॉ. समीर वी. कामत, उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमण्यम आदि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Popular 6 min read